Independence Day : लाल किल्ल्यावरून मणिपूर हिंसाचाराबाबत काय म्हणाले PM मोदी?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावर ध्वजारोहण केले. ध्वजारोहणानंतर पंतप्रधान मोदींनी स्वातंत्र्यदिनाच्या 140 कोटी जनतेला शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी विरोधकांवर जोरहल्ला चढवताना मणिपूर हिंसाचाराचावरही भाष्य केलं.
नवी दिल्ली, 15 ऑगस्ट 2023 | देशाच्या 77 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावर ध्वजारोहण केले. ध्वजारोहणानंतर पंतप्रधान मोदींनी स्वातंत्र्यदिनाच्या 140 कोटी जनतेला शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी विरोधकांवर जोरहल्ला चढवताना मणिपूर हिंसाचाराचावरही भाष्य केलं. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी, मणिपूर हिंसाचाराचावर बोलताना, देश मणिपूरसोबत आहे आणि आशा आहे की मणिपूरचे लोक शांतता राखतील. आपण हिंसाचाराचावर एकत्रितपणे तोडगा काढू. काही क्षण असे येतात की सुरुवातीला ते छोट्या घटनांसारखे वाटतात, परंतु नंतर ते अनेक समस्यांचे मूळ बनतात असं पंतप्रधान मोदी म्हणाले. तसेच देशातील काही भाग हा फक्त माझ्या आणि तुझ्यामुळेच प्रभावित झाले आहेत. मणिपूरमध्ये घटना घडली तर त्याचे दुःख महाराष्ट्रात होते. आसामला पूर आला तर केरळ अस्वस्थ होते.