VIDEO |‘माझ्या शास्त्रज्ञांना भेटण्यासाठी मी खूप उत्सुक’ : पंतप्रधान मोदी
भारताची महत्वाची चांद्रयान-3 मोहिम फक्ते झाल्यानंतर पंतप्रधान मोदी हे आज बंगळुरूला आले. जोहान्सबर्ग येथून ब्रिक्स परिषदेतून परतताच ते थेट बंगळुरूला पोहचले. यावेळी त्यांनी उपस्थितांना संबोधनाता इस्त्रोच्या शास्त्रज्ञांबाबत गौरवद्गार काढले.
बेंगळुरू : 26 ऑगस्ट 2023 | जोहान्सबर्ग येथील ब्रिक्स परिषदेत सहभागी झालेले पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशात परतताच थेट बेंगळुरूला गेले. यावेळी तेथे त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. तर जमलेल्या बेंगळुरूकरांना मोदी यांनी संबोधित केले. त्यांनी यावेळी, आपल्या वैज्ञानिक समुदायाने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. मी पाहतो की तुम्ही सर्व आनंद आणि अभिमानाने भरलेले आहात. मला सांगायला आनंद होतोय की असाच आनंद हा ग्रीस आणि जोहान्सबर्गमध्ये पाहायला मिळाला. चांद्रयान-3 मोहिमेमुळे संपूर्ण जगात भारताचे कौतुक होत आहे. तर माझ्या शास्त्रज्ञांना भेटण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. तसेच यावेळी त्यांनी शास्त्रज्ञांच्या कामगिरीचा उल्लेख करत ‘जय जवान, जय किसान, जय विज्ञान आणि जय अनुसंधान’चा नारा दिला.
Published on: Aug 26, 2023 09:01 AM
Latest Videos