VIDEO | ‘हे काही छोटे यश नाही, इतर देश जिथे पोहोचू शकले नाहीत तिथे...’; मोदी यांनी थोपटली शास्त्रज्ञांची पाठ

VIDEO | ‘हे काही छोटे यश नाही, इतर देश जिथे पोहोचू शकले नाहीत तिथे…’; मोदी यांनी थोपटली शास्त्रज्ञांची पाठ

| Updated on: Aug 26, 2023 | 10:11 AM

दोन देशांचा दौरा केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज शनिवारी थेट बंगळुरूला पोहोचले. येथे त्यांचे विमानतळाबाहेर नागरिकांनी ढोल-ताशांच्या गजरात स्वागत केले. यानंतर त्यांनी शास्त्रज्ञांना संबोधित केले.

बेंगळुरू : 26 ऑगस्ट 2023 | आज शनिवारी सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विमान थेट दिल्ली ऐवजी बेंगळुरू उतरले. त्यामुळे बेंगळुरूमधील नागरिक खुश होते. तर चांद्रयान-३ च्या मोहिमेत सहभागी असणाऱ्या शास्त्रज्ञांची उत्सुकता शिगेला पोहचली होती. कारण आज त्यांना पंतप्रधान मोदी हे भेटणार होते.

यावेळी पंतप्रधान मोदी यांचे विमानतळाबाहेर नागरिकांनी ढोल-ताशांच्या गजरात स्वागत केले. त्यावेळी मोदींनी ‘जय विज्ञान-जय अनुसंधन’ असा नवा नारा दिला. त्यानंतर त्यांनी बंगळुरूमध्ये चांद्रयान-3 मोहिमेत सहभागी शास्त्रज्ञ आणि इस्रोचे प्रमुख सोमनाथ यांची भेट घेतली.

त्यावेळी त्यांनी मोदींना मिशनची माहिती दिली. यानंतर पंतप्रधान मोदींनी संपूर्ण टीमचे अभिनंदन केले. त्यावेळी त्यांनी, हे काही छोटे यश नाही. इतर देश जिथे पोहोचू शकले नाहीत तिथे आम्ही पोहोचलो आहोत. यापूर्वी कोणीही करू शकले नव्हते ते आम्ही केले. हा आहे आजचा भारत, निर्भय भारत असे गौरवद्गार काढले.

Published on: Aug 26, 2023 10:11 AM