पंतप्रधान मोदी देवाचा अवतार त्यांना हवं तोपर्यंत ते...; 'या' भाजप मंत्र्याचं अजब वक्तव्य

पंतप्रधान मोदी देवाचा अवतार त्यांना हवं तोपर्यंत ते…; ‘या’ भाजप मंत्र्याचं अजब वक्तव्य

| Updated on: Oct 27, 2022 | 8:24 AM

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देवाचा अवतार आहेत असं अजब वक्तव्य मत्र्याकडून करण्यात आलं आहे. यामुळे विरोधक आता भाजपवर टीकेची झोड उठवू शकतात.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) हे देवाचा अवतार आहेत असं अजब वक्तव्य उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) एका मंत्र्याकडून करण्यात आलं आहे. गुलाब देवी यांनी हे वक्तव्य केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) हे देवाचा अवतार आहेत. असं गुलाब देवी यांनी म्हटलं आहे. गुलाब देवी एवढ्यावरच थांबल्या नाहीत तर मोदी हवं तोपर्यंत पंतप्रधान पदावर राहू शकतात असंही त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान आता गुलाब देवी यांच्या या वक्तव्यावरून वाद निर्माण होण्याची शक्यता असून, विरोधक सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठवू शकतात. यापूर्वी देखील अनेकदा असे  वाद निर्माण झाले आहेत.

Published on: Oct 27, 2022 08:23 AM