ते देशातले सर्वात मोठे कलाकार आहेत, …तर फिल्मफेअर त्यांनाच मिळतील; ओवेसी यांची पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका
पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रचारात व्यस्त आहेत. तर त्यांनी द केरळ स्टोरी चित्रपटावरून हा चित्रपट दहशतवादी कारस्थानांवर बनवण्यात आला आहे. यातून दहशतवादाचा भयानक आणि खरा चेहरा समोर आला आहे.
छ. संभाजीनगर : कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात असून बजरंग दल, बजरंग बली आणि नुकताच प्रदर्शित झालेला द केरळ स्टोरी यासारखे मुद्दे चर्चेत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रचारात व्यस्त आहेत. तर त्यांनी द केरळ स्टोरी चित्रपटावरून हा चित्रपट दहशतवादी कारस्थानांवर बनवण्यात आला आहे. यातून दहशतवादाचा भयानक आणि खरा चेहरा समोर आला आहे. आता काँग्रेस दहशतवादावर बनलेल्या या चित्रपटाला विरोध करत आहे. ते दहशतवादी प्रवृत्तींच्या पाठीशी उभे आहेत. काँग्रेसने नेहमीच व्होट बँकेसाठी दहशतवादाचा बचाव केला आहे अशी टीका केली होती. त्यावरून एआयएमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी याच मुद्द्यांवरून मोदींवर हल्लाबोल केला आहे. त्यांनी यावेळी हिटलरने सुद्धा 70 लाख जुनां मारलं होतं. इथेपण नरेंद्र मोदी तेच करत आहेत. आपल्याला इतिहास समजून घेतला पाहीजे. मोदी हिंदुत्वाचा अजेंडा राबवात आहेत. तर मोदी हा या चित्रपटाचे डायरेक्टर, स्क्रिप्ट रायटर की प्रोड्यूसर आहेत की देशाचे पंतप्रधान आहेत असा सवाल केला आहे. ते केव्हापासून चित्रपटाच्या प्रोमोशनचे काम करू लागले. आम्हाला माहित आहे, की ते देशातले सर्वात मोठे कलाकार आहेत. बॉलीवूड मधल्या चित्रपटांमध्ये काम केलं तर सगळे फिल्मफेअर त्यांनाच मिळतील.तर केरला स्टोरी सारख्या चित्रपटाचे ते प्रमोशन करतात हे मुस्लिम द्वेष करण्याची वाईट पद्धत आहे