PM Modi at Kashi | काशी विश्वनाथमधून पंतप्रधान नरेेंद्र मोदी LIVE

| Updated on: Dec 13, 2021 | 2:54 PM

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणासीतील काशी येथे कालभैरव मंदिरात जाऊन आरती केली. या मंदिरात मोदी जवळपास 20 मिनिटे होते. या पूजेच्या कार्यक्रमानंतर मोदींच्या हस्ते काशी विश्वानाथ धामचं लोकार्पण करण्यात येणार आहे.

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणासीतील काशी येथे कालभैरव मंदिरात जाऊन आरती केली. या मंदिरात मोदी जवळपास 20 मिनिटे होते. या पूजेच्या कार्यक्रमानंतर मोदींच्या हस्ते काशी विश्वानाथ धामचं लोकार्पण करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कालभैरव मंदिरात पूजा केल्यानंतर गंगा नदीत डुबकी घेत गंगा स्नान केलं. यावेळी मोदींनी पुष्ण आणि जल अर्पण करत मनोभावे सूर्य देवाची पूजा केली. तसेच पवित्र गंगेतील जल सोबतही घेतलं. यावेळी पंतप्रधान 339 कोटी खर्च करून तयार करण्यात आलेल्या काशी विश्वानाथ धामच्या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण करणार आहेत. याप्रसंगी 151 डमरू वादक डमरू वाजवून मोदींचं भव्य स्वागत करणार आहेत. त्या कार्यक्रमानंतर पीएम मोदी हे बरेका गेस्ट हाऊसला जाणार आहेत.
Prakash Ambedkar |… तर ओबीसींनी मुस्लिम धर्म स्वीकारावा, प्रकाश आंबेडकरांचं परखड मत
Super Fast News | सुपरफास्ट 50 न्यूज | 2 PM | 12 December 2021