LPG Price Hike : सुनील राऊतांसह 300 शिवसैनिकांना सिलेंडरची अंत्ययात्रा काढणं अन् हायवे रोखणं पडलं महागात, कारण…
आमदार सुनिल राऊत, विधानसभा प्रमुख परम यादव, माजी नगरसेविका रश्मी पहुडकर अनंत पाताडे, अभय राणे, प्रकाश पुजारी, आसावरी भोईटे, सिद्धी जाधव, सुशीला मंचेकर, प्रिया गावडे व इतर 250-300 पुरूष, महिला कार्यकर्त्यांनी सरकारविरोधात आंदोलन पुकारलं होतं.
मुंबईतील विक्रोळी येथे गॅस सिलेंडर दरवाढ विरोधात ‘केंद्र सरकारची तिरडी यात्रा’ आंदोलन करणं ठाकरे गटाचे आमदार सुनील राऊत यांना चांगलं भोवलं आहे. गॅस सिलेंडर दरवाढ विरोधात सिलेंडरची अंत्ययात्रा काढणं आणि हायवे रोखणं सुनील राऊत यांच्यासह तीनशे शिवसैनिकांना चांगलं महागात पडलं आहे. कारण सुनील राऊत यांच्यासह तीनशे शिवसैनिकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विक्रोळी पोलिसांनी अनधिकृत आंदोलन करणे, वाहतुकीस अडथळा निर्माण करणे अशा कलमांच्या अंतर्गत सुनील राऊत यांच्यासह तीनशे शिवसैनिकांवर गुन्हा दाखल केला आहे. गॅस दरवाढीविरोधात शिवसेना विक्रोळी विधानसभेच्या वतीने सुनील राऊत यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं. विक्रोळी मध्यवर्ती शाखेपासून पूर्व द्रुतगती मार्गापर्यंत सिलेंडरची अंत्ययात्रा काढून इंधन दरवाढीचा निषेध करण्यात आल्याचे काल पाहायला मिळाले. यावेळी मोदी सरकार हाय हाय अशा घोषणा ठाकरे गटाच्या संतप्त शिवसैनिकांनी देत हायवे रोखून धरला. यामुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झाला होता. सुनील राऊतांसह ३०० शिवसैनिकांनी शिवसेना कार्यालय परेश पारकर चौकी, विक्रोळी पुर्व, मुंबई येथुन विना परवाना केंद्र सरकारने केलेल्या गॅस दर वाढीबाबत विना परवाना, पोलीसांचे आदेश न मानता आंदोलन कर्त्यांनी रॅली काढली होती. याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

देशातील काही यूट्यूब चॅनेल बंद करण्याचे केंद्राचे आदेश

Pahalgam Attack : संयुक्त राष्ट्रसंघात भारतानं केली पाकिस्तानची पोलखोल

भारतीय फोन नंबर वापरून आयएसआय काढतंय लष्कराची माहिती

नाक दाबलं की तोंड उघडतं.,'सिंधू जल' स्थगितीवर काय म्हणाले अण्णा हजारे?
