जम्मूतही ’50 खोके एकदम ओक्के’चा नारा, शिंदे सरकारचा महाराष्ट्राबाहेर निषेध
जम्मूतील भारत जोडो यात्रेत 50 खोके एकदम ओक्केचा नारा भारत जोडो यात्रेत सहभागी असलेल्या कार्यकर्त्यांनी दिला आणि शिंदे सरकारचा निषेध व्यक्त केला
जम्मूमध्ये असलेल्या भारत जोडो यात्रेत 50 खोके एकदम ओक्केचा नारा भारत जोडो यात्रेत सहभागी असलेल्या कार्यकर्त्यांकडून देण्यात आला. या भारत जोडो यात्रेतून देण्यात आलेल्या 50 खोके एकदम ओक्केच्या घोषणाबाजीतून शिंदे-भाजप सरकारवर निशाणा साधण्यात आला. यावरून शिंदे सरकारचा महाराष्ट्राबाहेरही निषेध करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान आज, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे जम्मूमध्ये काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेत सहभागी झाले आहेत. आज पहाटेच संजय राऊत यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत आपला सहभाग दर्शविला. यात्रेत सहभागी होताच राहुल गांधी यांनी संजय राऊत यांची गळाभेट घेतली आणि त्यांचे यात्रेत स्वागत केले. भारत जोडो यात्रेतील राहुल गांधी आणि संजय राऊत यांच्या गळाभेटीचा हा फोटो सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
Published on: Jan 20, 2023 02:29 PM