Gilgit protests 2025 : पाकिस्तान सरकारला पाकिस्तानी नागरिकही वैतागले; गिलगीटमध्ये जोरदार निदर्शने सुरू
खनिज संसाधन आणि खाणींवर बेकायदेशीर रित्या नियंत्रण विरोधात पाकिस्तानच्या गिलगीटमध्ये पाकिस्तानी सरकार विरोधात जनता मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरली आहे.
पाकिस्तानच्या गिलगीट भागात पाकिस्तान सरकारविरोधात जोरदार निदर्शने केली जात आहेत. पाकिस्तान सरकारच्या विरोधात पाकिस्तानी नागरिकच रस्त्यावर उतरून जोरदार घोषणाबाजी करत असल्याचं बघायला मिळालं आहे. खान आणि खनिज कायदा 2025 विरोधात गिलगीटमधले नागरिक रस्त्यावर उतरलेले आहेत. जमिन, खनिज सांसाधनांवर बेकायदेशीर नियंत्रणाविरोधात या ठिकाणच्या नागरिकांमध्ये असंतोष आहे. त्यामुळे आता पाकिस्तानी सरकार विरोधात खुद्द पाकिस्तानी जनताच मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरलेली बघायला मिळाली आहे. त्यामुळे पाकिस्तानला अंतर्गत संघर्षाला तोंड द्यावं लागत आहे. एकीकडे सीमेवर भारताकडून कोंडी सुरू असतानाच खुद्द पाकिस्तानी जनता देखील त्यांच्या विरोधात उभी असल्याचं सध्या चित्र आहे.

