फर्ग्युसनमध्ये ही हिम्मत दाखवायची होती; भाजप नेत्याचा आव्हांडावर पलटवार
आव्हाडांच घाणेरडं राजकारण सुरू आहे. ते खालच्या थराला जात टीका करताना. जितेंद्र आव्हाड म्हणजे औरंगजेबाची पिलावळ आहे
पुणे : पुणे भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक आणि राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यातील वाद आता पेटण्याची शक्यता आहे. भावी खासदार म्हणून लागलेल्या पोस्टरवरून आव्हाड यांनी जोरदार टीका केली होती. त्यावर मुळीक यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. तसेच आव्हाड यांचा उल्लेख त्यांनी औरंगजेबाची पिलावळ असा केला आहे. आव्हाड यांनी जोरदार टीकेनंतर मुळीक यांनी त्या पोस्टरवरून स्पष्टीकरण दिलं. तसेच बापट यांचे आणि आपले खूप जिव्हाळ्याचे संबंध होते. ते मार्गदर्शक होते. त्यामुळे असे वाईट विचार कुठलाही कार्यकर्ता मनात आणू शकत नाही असेही मुळीक यांनी म्हटलं आहे.
तर आव्हाडांच घाणेरडं राजकारण सुरू आहे. ते खालच्या थराला जात टीका करताना. जितेंद्र आव्हाड म्हणजे औरंगजेबाची पिलावळ आहे. आज जशी बोलायचं हिम्मत दाखवली तशी फर्ग्युसन कॉलेजमध्ये का दाखवली नाही? का पळून गेलात? तुमच्या बॉडीगार्डची आत्महत्याचं कारण काय हे लोकांसमोर आलं पाहिजे. तर याबाबत सरकारकडे मागणी करणार असल्याचेही मुळीक म्हणाले.

महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात...

'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य

प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले

'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य
