गिरीश बापट यांच्या जाण्याने पुणे पोरकं झालं; चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडून श्रद्धांजली अर्पण
Girish Bapat Passed Away : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि खासदार आदरणीय गिरीश बापट यांचं निधन अतिशय दुःखद आहे. त्यांच्या जाण्याने पुणे आज पोरकं झालं, अशी भावना पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केली.
पुणे : भाजपचे नेते, खासदार गिरीश बापट यांचं निधन झालं आहे. त्यांच्या निधनानंतर चंद्रकांत पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. “खासदार गिरीश बापट यांच्यासारख्या ज्येष्ठ आणि अनुभवी व्यक्तिमत्त्वाच्या जाण्याने पक्षाचा आधारवड हरपला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक, नगरसेवक, आमदार, खासदार आणि राज्याचे मंत्री अशा विविध जबाबदाऱ्या त्यांनी उत्तमरित्या पार पाडल्या. बापट साहेबांनी आपल्या कार्यकर्तृत्वाने ‘पुण्याची ताकद गिरीश बापट’ ही ओळख जनमानसात तयार केली होती. आज बापट साहेबांच्या जाण्याने पुणे पोरकं झालं आहे. बापट साहेबांच्या जाण्याने आमचा मार्गदर्शक हरपला आहे, अशी भावना चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली आहे.
Published on: Mar 29, 2023 01:39 PM
Latest Videos