Daund Crime News : धक्कादायक! कचऱ्याच्या ढिगाऱ्यात प्लॅस्टिकच्या बरण्या; बरण्यांमध्ये अर्भकं, काय आहे प्रकार?
Pune Daund Crime : पुण्याच्या दौंड येथे एका कचऱ्याच्या ढिगाऱ्यात काही अर्भकं आढळून आली आहेत. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
पुणे दौंडमध्ये चक्क कचऱ्यात 6 ते 7 अर्भक आढळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्लॅस्टिकच्या बरण्यांमध्ये हे अर्भकं आढळून आले आहेत. दौंडच्या बोरावकेनगर भागात हा प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे. तर ही अर्भक कुठून आली? या संदर्भात आता पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आला आहे.
दौंड भागात एका काचऱ्याच्या ढिगाऱ्यात ही 6 ते 7 अर्भक वेगवेगळ्या प्लॅस्टिकच्या बरण्यांमध्ये असलेली सापडली आहे. तसंच काही अर्भकांच्या शरीराचे अवशेष देखील यात सापडले आहेत. या संदर्भात स्थानिकांनी दौंड पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर घातस्थळी दाखल होत पोलिसांनी याबद्दल कसून तपास सुरू केला आहे.
Published on: Mar 25, 2025 03:12 PM
Latest Videos

कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, मद्रास हाय कोर्टाचा दिलासा

केवळ दशक नाही, तर लोकांचं आयुष्य बदललंय - पंतप्रधान नरेंद्र मोदी

बावनकुळे - राऊत यांच्यात जुंपली; वार पालटवाराचं शाब्दिक युद्धं

आमचं सरकार टॅक्सच्या पै पैचा सन्मान करतं - पंतप्रधान नरेंद्र मोदी
