Pune Hit And Run Case : रईस बापाची औलाद सुटणार की अडकणार? बिघडलेल्या अल्पवयीन वेदांतचं पुढं काय?
दारू पिऊन भरधाव वेगाने गाडी चालवत अनिश अवधिया आणि अश्विनी कोस्थाला उडवणाऱ्या वेदांत अग्रवालचं पुढे काय होणार? याकडेच साऱ्यांचे लक्ष लागून आहे. पुण्यातील अपघात प्रकरणावरून आता पैशांच्या मस्तीने बिघडलेल्या अल्पवयीन वेदांत अग्रवालच काय होणार?
पुण्यातील अपघात प्रकरणावरून आता पैशांच्या मस्तीने बिघडलेल्या अल्पवयीन वेदांत अग्रवालच काय होणार? प्रौढ मानून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करायची का? याचा फैसला बाल हक्क न्यायालय देणार आहे. तर माजी गृहमंत्री अनिल देशमुखांनी सध्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा मागितला आहे. ‘देवेंद्रजी, काही दिवसांपूर्वी तुम्ही म्हणाले होते की, गाडीखाली कुत्राही आला तरी विरोधक राजीनाम्याची मागणी करतील. आज एका गरीब कुटुंबातील दोन मुलं श्रीमंत माणसाच्या गाडीखाली चिरडली गेली आणि त्यांना मारणाऱ्याला तुमच्या व्यवस्थेने पिझ्झा बर्गर खाऊ घातला आणि त्याला दहा तासांत (तेही रविवारी) जामीन मिळाला. देवेंद्रजी, आता तुम्हीच मला सांगा की आम्ही गृहमंत्र्यांचा राजीनामा का मागू नये?’, असा थेट सवाल अनिल देशमुखांनी केला आहे. दरम्यान, दारू पिऊन भरधाव वेगाने गाडी चालवत अनिश अवधिया आणि अश्विनी कोस्थाला उडवणाऱ्या वेदांत अग्रवालचं पुढे काय होणार? याकडेच साऱ्यांचे लक्ष लागून आहे. तर दुसरीकडे विशाल अग्रवालला पुणे सत्र न्यायालयाने तीन दिवसांची म्हणजेच २४ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.