सह्याद्री पर्वत रांगेतील पांडवकालीन कांब्रे लेणीची धडकी भरवणारी दृश्य ड्रोनमध्ये कैद, बघा व्हिडीओ

सह्याद्री पर्वत रांगेतील पांडवकालीन कांब्रे लेणीची धडकी भरवणारी दृश्य ड्रोनमध्ये कैद, बघा व्हिडीओ

| Updated on: Apr 22, 2023 | 6:25 AM

VIDEO | सहयाद्रीच्या पर्वत रांगेत वसलेल्या मावळ तालुक्याला निसर्गानं भरभरून सौंदर्य दिलंय त्यापैकीच एक कांब्रेची लेणी, ड्रोनच्या नजरेतून बघा दृश्य

पुणे : सहयाद्रीच्या पर्वत रांगेत वसलेल्या मावळ तालुक्याला निसर्गानं भरभरून सौंदर्य दिलं आहे. त्यापैकीच एक असलेली कांब्रेची लेणी. पुण्यातील आंदर मावळात सहयाद्री पर्वत रांगेत कांब्रेची अदभुत डोळ्याचं पारणं फेडणारी ही लेणी आहे. दक्षिणोत्तर अर्धवर्तुळाकर डोंगराच्या मुख्य गर्भात पूर्वभिमुख कातळ कोरीव ही पांडवकालीन खोदलेली लेणी असून शेकडो वर्षांपूर्वी बौद्ध भिक्षूंच निवासस्थान किंवा विश्राम करावयास येत असल्याची दंतकथा असल्याचं बोललं जातं. पुण्यातील भटकंती करणाऱ्या एका समूहाने या कांब्रे लेणीचं ड्रोनच्या माध्यमातून चित्र चित्रित केलं आहे. बघा ड्रोननं चित्रित केलेलं दृश्य

Published on: Apr 22, 2023 06:21 AM