नवनिर्वाचित आमदार रविंद्र धंगेकर उद्या राज ठाकरे यांना भेटणार, अजून कोणाच्या घेणार गाठीभेठी?

नवनिर्वाचित आमदार रविंद्र धंगेकर उद्या राज ठाकरे यांना भेटणार, अजून कोणाच्या घेणार गाठीभेठी?

| Updated on: Mar 07, 2023 | 10:00 PM

VIDEO | पुण्यातील कसब्याचे नवनिर्वाचित काँग्रेसचे आमदार रविंद्र धंगेकर उद्या मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेणार, काय आहे कारण?

पुणे : पुण्यातील कसब्याचे नवनिर्वाचित काँग्रेसचे आमदार रविंद्र धंगेकर उद्या मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेणार आहेत. यासह रविंद्र धंगेकर उद्या उद्धव ठाकरे, अजित पवार यांचीदेखील मुंबईत भेट घेणार आहे. तर रविंद्र धंगेकर यांचा आमदारकीचा 9 तारखेला शपथविधी असणार आहे. मात्र या शपथविधी रविंद्र धंगेकर हे उद्या बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती स्थळावर जाऊन दर्शन घेणार आहेत. तर राज्यात सर्वत्र होळी आणि धुळवड हा सण साजरा होत असून होळीच्या दिवशी रविंद्र धंगेकर यांच्या पत्नीने आमदारकीचा रंग चढलाय मात्र समाजसेवेचा रंग आणखी चढू दे हे म्हणत त्यांनी रविंद्र धंगेकर यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

Published on: Mar 07, 2023 09:59 PM