किरीट सोमय्या गिरीश बापट यांच्या कुटुंबियांच्या भेटीला; आठवणींना उजाळा देताना म्हणाले…
Kirit Somaiya Meetis Girish Bapat Family : गिरीशभाऊ बापट आदर्शवादी नेते होते. त्यांच्याकडून बरंच शिकता आलं. किरीट सोमय्या यांनी बापट कुटुंबाची भेट घेतली आहे. पाहा व्हीडिओ...
पुणे : भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी आज गिरीश बापट यांच्या कुटुंबाची भेट घेतली. यावेळी त्यांनी गिरीश बापट यांच्या बाबतच्या आठवणी जागवल्या. गिरीश बापट म्हणजे हाडाचा कार्यकर्ता. नवीन पिढीने गिरीश बापट यांच्याकडून शिकायला हवं. राजकीय नेत्यांनी बापट यांच्याकडून आदर्शवादी नेते म्हणून शिकायला हवं. गिरीश बापट यांनी संघर्ष केला. आपलं पुणे शहर देशात पुढे असावं यासाठी ते नेहमीच प्रयत्न करायचे. यात मोठं योगदान राहिलं आहे. बापट यांनी अनेक कार्यकर्ते तयार केले आहेत. पुण्याला पुढे घेऊन जाण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत, असं बापट म्हणाले.
Published on: Mar 30, 2023 03:34 PM
Latest Videos