अजित पवारांचा सबुरीचा सल्ला; भाजप मात्र ठाम, विजय आमचाच होणार कराड यांचा विश्वास
महाविकास आघाडी तर्फे कोण लढेल ते सांगता येत नाही. पण भारतीय जनता पार्टीचा निर्णय मात्र महाराष्ट्र आणि केंद्रीय पार्लमेंट बोर्ड घेत असतं. त्यामुळे ही जागा पारंपरिक भाजपची आहे. येथे भाजपच जिंकेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
छ. संभाजीनगर : पुणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार आणि भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते गिरीश बापट यांचे विधन झाल्याचे आता तेथे पोटनिवडणूक लागणार आहे. त्यावरून आतापासूनच सर्व पक्ष तयारीला लागल्याचे दिसत आहे. याच्याआधी काँग्रेसचे नेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी आम्ही मविआ म्हणून ही पोटनिवडणूक लढवणार असल्याचे घोषित केलं होते. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी सबुरीचा सल्ला दिला होता. यानंतर आता भाजपकडून हा मतदारसंघावर आपला अधिकार सांगण्यात येत आहे. यावरून केंद्रीय मंत्री भागवत कराड यांनी भाजपची भूमिका मांडली. भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते कैलासवासी गिरीजी बापट हे एक अत्यंत चांगले संघटक होते. त्यांच्या निधनामुळे पुणे लोकसभा पोटनिवडणूक लागेल. महाविकास आघाडी तर्फे कोण लढेल ते सांगता येत नाही. पण भारतीय जनता पार्टीचा निर्णय मात्र महाराष्ट्र आणि केंद्रीय पार्लमेंट बोर्ड घेत असतं. त्यामुळे ही जागा पारंपरिक भाजपची आहे. येथे भाजपच जिंकेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.