अजितदादा यांनी जो शाल जोडीतला आहेर दिला तो योग्यच; शिवतारे याची टीका
माजी मंत्री विजय शिवतारे यांनी सर्व पक्षांना चांगलेच झापलं आहे. तसेच त्यांनी गिरीश बापट गेले हे सर्वांसाठी वेदना देणारे आहे असं म्हटलं आहे
मुंबई : पुण्याचे खासदार गिरिष बापट यांचे निधन झाल्यानंतर त्याजागेवर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांनी दावा केला. इतकेच काय तर भाजप पुणे शहराध्यक्षांचे तर भावी खासदार असे पोस्टर लागले. यादरम्यान काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचे कान विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी टोचताना जरा थांबा जनाची नाही तर मनाची तरि बाळगा असा सल्ला दिला होता. याचमुद्द्यावरून माजी मंत्री विजय शिवतारे यांनी सर्व पक्षांना चांगलेच झापलं आहे. तसेच त्यांनी गिरीश बापट गेले हे सर्वांसाठी वेदना देणारे आहे. याबाबत जर भाजपने दावा केला असेलतर ती जागा भाजपचीच होती. पण राष्ट्रवादी आणि काँग्रेस ज्या पद्धतीने त्या ठिकाणी राजकारण करू पाहताय ते मानवतेला शोभणारे वर्तन नाहीये. अजित पवार यांनी जे शाल जोडीतले आणि घरचा आहेर या लोकांना दिला आहे तो अगदी योग्य असल्याचे शिवतारे यांनी म्हटलं आहे.

महाराष्ट्रात विमानाने यायचा, रेल्वेने सोलापूर गाठायचा अन् मग..

गोरेंच्या सुपुत्राचा प्रताप! भैय्या पाटलांनी ट्विट केला व्हिडिओ

कराडने अनेक छोटे-मोठे गुंड जेलमध्ये बोलावून घेतलेत; आव्हाडांचं ट्विट

वाल्मिक कराडने जेलरच्या ऑफिसमध्ये बसून सगळं प्लॅनिंग केलं - मीरा गीते
