वेळ पडली तर बारसूला जाणार; बारसूतील आंदोलनावर अजित पवार यांची प्रतिक्रिया
Ajit Pawar on Barsu Farmer Protest : भोपाळची पुनरावृत्ती बारसूमध्ये होता कामा नये; रसूतील आंदोलनावर अजित पवार यांची सविस्तर प्रतिक्रिया, पाहा व्हीडिओ...
पुणे : रत्नागिरीतील बारसूमध्ये होऊ घातलेल्या रिफायनरी प्रकल्पाला स्थानिकांनी विरोध केलाय. या प्रकल्पाविरोधात आंदोलन केलं जातंय. यावर विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी भाष्य केलं आहे. भोपाळची पुनरावृत्ती बारसूमध्ये होता कामा नये, असं अजित पवार म्हणाले आहेत. मी बारसूला जायचं ठरवलं नाही पण वेळ पडली तर जाईल, असंही अजित पवार म्हणालेत. नाणारबद्दल जसा प्रश्न उपस्थित झाला होता तेव्हा उद्धवसाहेबांनी हा विषय चर्चेसाठी घेतला होता. पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही, हे बघितलं पाहिजे. उदय सामंत यांच्याशी बोललो त्यांना सांगितलं की तिथल्या लोकांचा कुठल्या गोष्टीला विरोध आहे, हे विचारायला हवं. तिथल्या लोकांचे व्यवसाय अडचणीत येऊ शकतो, म्हणून हा विरोध आहे का का इतर कारण आहेत हे बघायला हवं. लाखो लोकांना यातून रोजगार मिळणार आहे. परिसराचं कायमचं नुकसान होणार असेल तर विरोध नक्की करा. पण त्यातून जर फायदा होणार असेल तर त्याचा विचार करायला हवा, असंही अजित पवार म्हणालेत.