पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी; चांदणी चौकातील पहिला भुयारी मार्ग वाहतुकीसाठी खुला

पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी; चांदणी चौकातील पहिला भुयारी मार्ग वाहतुकीसाठी खुला

| Updated on: Apr 15, 2023 | 4:03 PM

Amaravti News : पुणेकरांसाठी महत्वाची बातमी. पुण्यातील चांदणी चौकातील पहिला भुयारी मार्गाने वाहतुकीसाठी सुरू झाली आहे. पाहा व्हीडिओ...

पुणे : पुण्यातील चांदणी चौकातील पहिला भुयारी मार्गाने वाहतुकीसाठी सुरू झाली आहे. चांदणी चौकातून मुळशीकडे जाणारा भुयारी मार्ग वाहतुकीसाठी सुरू करण्यात आला आहे. या मार्गाने मुळशी पौड पुढे कोकणात देखील जाता येणार आहे. मुळशीकडे जाणारी वाहतूक कोंडी आता रोखली जाणार आहे. मुख्य बोगदा वाहतुकीसाठी सुरू झालाय. भुयारी मार्गात रेखाटण्यात अनेक रेखाचित्र आली आहेत. संपूर्ण मुळशी तालुक्याचे वैशिष्ट्य सांगणारे वैशिष्ट्यपूर्ण रेखाचित्र या भुयारी मार्गात रेखाटण्यात आली आहेत. मुळशी तालुक्यातील भक्ती शक्तीचा संगम, मुळशी तालुक्यात होणारी भात शेती मुळशीतील पर्यटन स्थळे आणि देवदर्शन स्थळे इथे साकारण्यात आली आहेत. त्यासोबतच मुळशी तालुक्यातील जगप्रसिद्ध कुस्ती असे रेखाचित्र या भुयारी मार्गात रेखाटण्यात आली आहेत.

Published on: Apr 15, 2023 04:03 PM