ऑफिसच्या कामासाठी व्हॉट्सअपचा वापर बंद करा; जीएसटीच्या अधिकाऱ्यांचं अनोखं आंदोलन
पुण्यातील जीएसटी आयुक्तालयाच्या अंतर्गत कोल्हापूर आणि गोवा हे दोन्ही कार्यक्षेत्र येतात. याच कार्यक्षेत्रातील तीन वर्ष पूर्ण झालेल्या सर्व अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. याच्याच विरोधात या अधिकाऱ्यांनी आता हे अनोखं सुरू केलं आहे.
पुणे : ऑफिसच्या कामासाठी व्हॉट्सअपचा वापर बंद करण्यासाठी पुण्यात आंदोलन करण्यात आलं. बदल्यांच्या विरोधात जीएसटी अधिकाऱ्यांनी पुण्यात अनोखं आंदोलन केलं. बदलांच्या विरोधात पुण्यातील अधिकाऱ्यांनी अभिनव आंदोलन केलं. ऑल इंडिया सुपरिडेंट ऑफ इनडायरेक्ट टॅक्सेस असोसिएशन बुधवारपासून आंदोलन सुरू आहे. बदलांच्या विरोधात अधिकारी आंदोलन करत आहेत. तर बदल्या योग्यच, असा निर्वाळा कॅटने दिला आहे. ऑफिसच्या कामासाठी वैयक्तिक फोनचा वापर करायचा नाही. त्यासोबतच व्हाट्सअपवरून कार्यालय कामाचा संवाद साधन बंद करण्यात यावं. त्यासोबतच वैयक्तिक कामासाठी कार्यालयीन वाहनांचा वापर करणं टाळायचं, यासाठी ही आंदोलन केलं जात आहे. असा अनोखा आंदोलनाचा पवित्र घेत पुण्यात जवळपास 350 कर्मचारी आणि अधिकारी या आंदोलनात सहभागी झाले आहेत. पुण्यासह कोल्हापूर आणि गोव्यात देखील या अधिकाऱ्यांचं आंदोलन सुरू आहे.