मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह धर्माधिकारी यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; ‘या’ संघटनेची मागणी
Maharashtra Bhushan Award Ceremony 2022 : महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात उष्माघातामुळे 11 श्रीसदस्यांचा मृत्यू; 'या' संघटनेची गुन्हा दाखल करण्याची मागणी
पुणे : पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या सोहळ्यात उष्मघातामुळे 50 हून अधिक सदस्यांना त्रास झाला आहे. या सोहळ्यात उष्माघातामुळे 11 श्रीसदस्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर कारवाईची मागणी होत आहे. संभाजी ब्रिगेडनेही कारवाईची मागणी केली आहे. “डॉ. आप्पा धर्माधिकारी या व्यक्तीच्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान कार्यक्रमात अंदाजे 11 पेक्षा जास्त लोक मृत्युमुखी पडल्याची बातमी पाहिली. बरेचजण अत्यावस्थ आहेत. कार्यक्रम आयोजनाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक मंत्री, प्रधान सचिव यांच्यासह आप्पा धर्माधिकारी यांच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे”, अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे संतोष शिंदे यांनी केली आहे.
Published on: Apr 17, 2023 09:24 AM
Latest Videos