Pune Porsche Accident : अपघातवेळी ड्रायव्हिंग सीटवर कोण होतं? पोलीस आयुक्तांचा मोठा खुलासा काय?

| Updated on: May 24, 2024 | 2:28 PM

पुण्यातील पॉर्शे कार अपघात प्रकरणी काँग्रेस नेते रवींद्र धंगेकर चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. या प्रकऱणात रोज नवनवे अपडेट समोर येत आहे. पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी आज दुपारी पत्रकार परिषद घेतली या प्रकरणी महत्वाचा खुलासा केला आहे. बघा नेमकं काय म्हणाले?

पुण्यातील पॉर्शे कार अपघात प्रकरणात रोज नवनवे अपडेट समोर येत आहे. नुकताच करण्यात आलेला नवा दावा म्हणजे हा अपघात घडला तेव्हा तो अल्पवयीन मुलगा नव्हे तर ड्रायव्हरच गाडी चालवत होता, असे अल्पवयीन मुलाचे वडील विशाल अग्रवाल यांनी सांगितले. तर दुसरीकडे मुलाला वाचवण्यासाठी हा दावा करण्यात आल्याचे म्हटले जात आहे. मात्र हा दावा पुणे पोलीस आयुक्तांनी फेटाळला आहे. अल्पवयीन आरोपी हाच गाडी चालवत होता. घरातून निघताना पोर्शे गाडी घेऊन अल्पवयीन आरोपीच निघाला असंही रेकॉर्ड आहे, सीसीटीव्ही फुटेजही आहे, असे पुणे पोलीस आयुक्तांनी स्पष्ट केले. पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी आज दुपारी पत्रकार परिषद घेतली या प्रकरणी महत्वाचा खुलासा केला आहे. बघा नेमकं काय म्हणाले?

Published on: May 24, 2024 02:28 PM
Pune Porsche Accident : पुण्यातील हिट अँड रन केसमध्ये दबाव की दिरंगाई? पुणे पोलीस आयुक्तांनी स्पष्टच सांगितलं….
ठरलं… लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाराष्ट्रात आणखी एका निवडणुकीचं वाजलं बिगूल