कोणी शाळेला मास्तर देता का मास्तर; शिक्षणाच्या माहेर घरातच शिक्षणाला घरघर
पढ़ेगा इंडिया, तभी तो आगे बढ़ेगा इंडिया या स्लोगनलाच ग्रहन लागल्याचे पहायला मिळत आहे. तर येथे शाळेत शिक्षकच नसल्याचे मास्तरच नाही तर कसे शिक्षतील विद्यार्थी असे म्हणण्याची वेळ आली आहे.
पुणे : पुणे हे शिक्षणाचे माहेर घर मानले जाते. येथे प्राथमिक पासून उच्च शिक्षणापर्यंत उच्च दर्जाचे शिक्षण मिळत असल्यानेच राज्याच्या काणोकोपऱ्यातून नाही तर देशात आणि विदोशातूनही विद्यार्थी शिकायला येत असतात. मात्र आता तेथील प्राथमिक शिक्षणच मुलांना मिळण महाग झाल्याचे समोर येत आहे. तर आदिवासी भागातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये शिक्षकच नसल्याने अनेक शाळा बंद अवस्थेत असल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे पढ़ेगा इंडिया, तभी तो आगे बढ़ेगा इंडिया या स्लोगनलाच ग्रहन लागल्याचे पहायला मिळत आहे. तर येथे शाळेत शिक्षकच नसल्याचे मास्तरच नाही तर कसे शिक्षतील विद्यार्थी असे म्हणण्याची वेळ आली आहे. ही स्थिती आहे. पुण्यातील खेड तालुक्यातील आदिवासी भागातील. येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये शिक्षकच नसल्याने अनेक शाळा बंद अवस्थेत आहेत. तर शिक्षकच नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. नव्या शैक्षणिक वर्षांमध्ये बहुतांशी बदल्या झाल्या असून रिक्त झालेल्या जागी दुसरे शिक्षक नेमणूक झालेल्या नसल्याने अनेक शाळांमध्ये एकच शिक्षक आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे.