Narendra Modi at Punjab | हिच ती जागा, जिथून पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘जिवंत परतले’!

| Updated on: Jan 06, 2022 | 4:26 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंजाब दौऱ्यात सुरक्षेत त्रुटी राहिली होती. त्यामुळे मोदींना हा दौरा अर्ध्यावरच टाकून परतावे लागले आहे. आता या प्रकरणात नवीन माहिती आली आहे. पंजाबमध्ये काही ठिकाणी निदर्शने होणार असल्याचे इनपुट गुप्तचर विभागाने दिले होते. पण पंजाब पोलिसांनी त्याकडे दुर्लक्ष केलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंजाब दौऱ्यात सुरक्षेत त्रुटी राहिली होती. त्यामुळे मोदींना हा दौरा अर्ध्यावरच टाकून परतावे लागले आहे. आता या प्रकरणात नवीन माहिती आली आहे. पंजाबमध्ये काही ठिकाणी निदर्शने होणार असल्याचे इनपुट गुप्तचर विभागाने दिले होते. पण पंजाब पोलिसांनी त्याकडे दुर्लक्ष केलं. तसेच ब्ल्यू बुक नियमांकडेही कानाडोळा केला असल्याचं गृहमंत्रालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं. केंद्रीय गृहमंत्रालयातील एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, ब्ल्यू बुकनुसार, राज्य पोलिसांना कोणतीही प्रतिकूल परिस्थिती दिसून आल्यास, त्यावेळी एक पर्यायी आकस्मिक मार्ग तयार ठेवायचा असतो. पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर इंटेलिजन्स ब्युरोचे अधिकारी सातत्याने पंजाब पोलिसांच्या संपर्कात होते. तसेच पंजाब पोलिसांना आंदोलकांबाबत माहिती देण्यात आली होती. पंजाब पोलिसांनीही सुरक्षेची संपूर्ण हमी दिली होती.

Mumbai | रश्मी ठाकरेंबाबत केलेल्या ट्वीट प्रकरणावर शिवसेना नेत्या मनिषा कायंदे यांची प्रतिक्रिया
BJP Protest : काँग्रेसचा निषेध करण्यासाठी भाजपा कार्यकर्त्यांचं दादरच्या फूल मार्केटजवळ आंदोलन