मुलाच्या करियरसाठी R. Madhawan दुबईत शिफ्ट, पोस्ट करत म्हणाला…
आर. माधवन(R Madhavan)चा मुलगा वेदांत (Vedaant) यानं 2026च्या ऑलिम्पिक(Olympics)ची तयारी सुरू केलीय. मात्र, सध्या देशात सुविधांचा अभाव असल्यानं तो आपली पत्नी सरितासह आपल्या मुलाच्या प्रशिक्षणासाठी दुबई(Dubai)ला गेलाय.
आर. माधवन(R Madhavan)चा मुलगा वेदांत (Vedaant) यानं 2026च्या ऑलिम्पिक(Olympics)ची तयारी सुरू केलीय. मात्र, सध्या देशात सुविधांचा अभाव असल्यानं तो आपली पत्नी सरितासह आपल्या मुलाच्या प्रशिक्षणासाठी दुबई(Dubai)ला गेलाय. वेदांत एक राष्ट्रीय स्तरावरील जलतरणपटू (National Swimming Champion) आहे. माधवन आणि त्याच्या पत्नीची इच्छा होती, की त्यानं सर्वात मोठ्या क्रीडा स्पर्धेची तयारी करत असताना त्याला सर्वोत्कृष्ट सुविधा मिळाव्यात. माधवननं एका मुलाखतीत सांगितलं, की आमचं कुटुंब दुबईमध्ये आहे जेणेकरून त्याच्या मुलाला मोठ्या तरणतलावामध्ये प्रशिक्षण घेण्याच्या दृष्टीनं प्रवेश मिळावा. मुंबईतले मोठे जलतरण तलाव एकतर कोविडमुळे बंद आहेत. जे आहेत तेही खूप अंतरावर आहेत. आम्ही इथं दुबईमध्ये वेदांतसोबत आहोत. इथं त्याला मोठ्या तलावांमध्ये प्रवेश आहे. तो ऑलिम्पिकची तयारी करतोय. मी आणि सरिता (त्याची पत्नी) त्याच्या पाठीशी आहोत, असं माधवन म्हणाला.