उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनाच फक्त एकमेकांवर विश्वास; भाजपच्या मंत्र्याचा टोला

उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनाच फक्त एकमेकांवर विश्वास; भाजपच्या मंत्र्याचा टोला

| Updated on: Mar 07, 2023 | 10:14 AM

Radhakrishna Vikhe Patil : संजय राऊत यांना दिलेल्या नोटीस संदर्भात हक्कभंग समिती निर्णय करेल, असं महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले आहेत. तसंच विखे पाटील यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना टोला लगावला आहे.

मुंबई : राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना टोला लगावला आहे. संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांचाच फक्त एकमेकांवर विश्वास उरलेला दिसतोय. अन्य कुणाला त्यांच्यावर विश्वास आहे की नाही ते माहीत नाही. मात्र दोन्ही नेत्यांकडून महाराष्ट्रातील जनतेचं मनोरंजन सुरू होत आहे. उद्धव ठाकरेंवर विरोधी पक्षाच्या नेत्यांचा विश्वास असल्याचं संजय राऊत म्हणाले होते. राऊतांच्या या वक्तव्यावरून विखे पाटलांनी खिल्ली उडवली आहे.

Published on: Mar 07, 2023 10:14 AM