RadhaKrushna Vikhe Patil | मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपचीच सत्ता येईल, ही काळ्या दगडावरची रेख
बोलघेवड्या माणसांना पुढं करून पक्षाची अधोगती होईल. भविष्यात शिवसेनेला कोणी गांभीर्याने घेणार नाही अशी टिका भाजप आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी शिवसेनेवर केलीय. आदिवासींच्या जमिनी बिगर आदिवासींना विकण्याचा महसुलचा एकमेव धंदा बनलाय.
अहमदनगर : शिवसेनेची मंडळी आता करमणुकीचे साधन झाली आहे. गोव्यात तुम्हाला नोटापेक्षा कमी मते मिळाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना यावर आत्मपरिक्षण करण्याची गरज आहे. बोलघेवड्या माणसांना पुढं करून पक्षाची अधोगती होईल. भविष्यात शिवसेनेला कोणी गांभीर्याने घेणार नाही अशी टिका भाजप आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी शिवसेनेवर केलीय. आदिवासींच्या जमिनी बिगर आदिवासींना विकण्याचा महसुलचा एकमेव धंदा बनलाय. बिल्डरांना जागा विकल्या जाताहेत. सरकारने जर कारवाई केली नाही तर कोर्टात जाणार असल्याचे सांगताना राज्यात वाळू माफियांचा धुमाकुळ सुरू असून सत्तेतील पक्ष स्वतःचे भलं करण्याच्या मागे लागले आहेत. राज्यातील जनतेशी त्यांना काही देणं घेणे नाही अशी टिका विखे पाटलांनी महाविकास आघाडी सरकारवर केलीय.