उद्धव ठाकरेंनी आता ठाण्यात येण्याचा काय उपयोग?; शिंदे गटाच्या बड्या नेत्याचा सवाल
उद्धव ठाकरे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असणाऱ्या ठाण्यात आहेत. त्यांच्या या दौऱ्यावर राहुल शेवाळे यांनी टीका केली आहे. पाहा...
उद्धव ठाकरे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असणाऱ्या ठाण्यात आहेत. तिथे ते नेते आणि कार्यकर्त्यांच्या भेटी घेत आहेत. यावर शिंदेगटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी टीका केली आहे. “उद्धव ठाकरे ठाणे दौऱ्यावर आहेत. पण आता हा दौरा करून काय उपयोग? त्यांनी हे दोन वर्षांपूर्वीच करायला हवं होतं. त्यांनी ते केलं नाही. त्यामुळे आता दौरे करण्याची वेळ आलीय. पण त्याचा आता काहीही उपयोग नाही”, असं राहुल शेवाळे म्हणालेत.
Published on: Jan 26, 2023 03:09 PM
Latest Videos