raigad crime news : धबधब्याच्या डोहात भलतचं घडलं! मोठ्या भावाला वाचवायला गेला अन् दुर्दैवी घटना घडली
तर या धक्क्यामुळे अख्ख कुटूंब दुखाच्या सागरात बुडालेलं आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, वीस वर्षीय स्मित राजेंद्र घाडगे या तरूणाचा त्याच्या भावाला वाचवताना धबधब्याच्या डोहात बुडून मृत्यू झाला.
रायगड, 8 ऑगस्ट 2023 | येथील महाड तालुक्यातील दहीवड गावात अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. ज्यामुळे गावावर सध्या शोककळा पसरली आहे. तर या धक्क्यामुळे अख्ख कुटूंब दुखाच्या सागरात बुडालेलं आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, वीस वर्षीय स्मित राजेंद्र घाडगे या तरूणाचा त्याच्या भावाला वाचवताना धबधब्याच्या डोहात बुडून मृत्यू झाला. तो त्याचा मोठा भाऊ आणि चार एक मीत्र वाळण खुर्द येथील घावर कोडं धबधब्यावर गेले होते. मात्र मोठा भाऊ धबधब्याच्या डोहात बुडत असल्याने स्मित त्याला वाचवायला डोहात गेला. त्याने भावाला वाचवले मात्र तो त्याच धबधब्याच्या डोहात बुडाला. ही घटना सोमवार दिनांक 7 ऑगस्टला दुपारी घडली.
Published on: Aug 08, 2023 08:51 AM
Latest Videos