मध्य, पश्चिम रेल्वेच्या स्टॉलवरून ‘रेलनीर’ गायब, काय आहे कारण?
VIDEO | मध्य, पश्चिम रेल्वेवर 9 खासगी कंपन्यांना बाटलीबंद पाणीविक्रीस परवानगी
मुंबई : मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेच्या स्टॉलवरून ‘रेलनीर’ गायब झाल्याचे पाहायला मिळत आहे तर मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेच्या स्टॉलवर नऊ खासगी, कंपन्यांना बाटलीबंद पाणीविक्रीस परवानगी देण्यात आली आहे. इंडियन रेल्वे कॅटरिंग अॅण्ड टुरिझम कॉर्पोरेशनतर्फ रेल्वे स्थानक आणि मेल-एक्स्प्रेसमध्ये बाटलीबंद ‘रेलनीर’ पाण्याचा पुरवठा केला जातो. गेल्या दोन महिन्यांत ‘रेलनीर’च्या मागणीत वाढ झाली आहे. मात्र, अंबरनाथ येथील कारखान्यात बाटलीबंद पाणी निर्मितीची उत्पादन क्षमता मर्यादित असल्याने तुटवडा जाणवला. रेल्वे स्थानकांत प्रवाशांना पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहावे लागू नये, यासाठी रेल्वेच्या प्रत्येक स्टॉलवर रेल्वेने नियुक्त केलेल्या खासगी कंपन्यांच्या बाटलीबंद पाण्याची विक्री करण्यात येत आहे, अशी माहिती मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
Published on: May 29, 2023 02:10 PM
Latest Videos