VIDEO |लोकलमध्ये टीसी असल्याचा रूबाब मारत प्रवाशांना लुटणाऱ्या तोतया टीसी अखेर जेरबंद

VIDEO |लोकलमध्ये टीसी असल्याचा रूबाब मारत प्रवाशांना लुटणाऱ्या तोतया टीसी अखेर जेरबंद

| Updated on: Aug 26, 2023 | 12:43 PM

गेल्या काही दिवसापासून तोतया गिरी पुणे आणि मुंबईमध्ये उघड झाली आहे. यात तोतया पोलिस अधिकारी, लष्कर अधिकारी आणि मर्चंड नेव्हीतील अधिकारी यांचे भांडे फोड झाले आहे. याबाबत काहीच दिवसांपुर्वी पुण्यात पोलिसांकडून मोठी कारवाई करत तोतया लष्कर अधिकारी आणि मर्चंड नेव्हीतील अधिकारी भावणाऱ्यांना बेड्या ठोकण्यात आल्या होत्या.

नागपूर : 26 ऑगस्ट 2023 | काही महिन्यांपुर्वी पुण्यात तोतया लष्करी आणि नेव्ही अधिकाऱ्याचा भाडा फोड झाला होता. यात दोघांना पुणे पोलिसांनी ताब्यात घेतले होते. तर यामागे मोठं रॅकेड असल्याचे त्यावेळी उघड झाले होते. याचा सध्या तपास सुरू असतानाच आता रेल्वे पोलिसांनी आता तोतया टीसीला बेड्या ठोकत जेलबंद केलं आहे. त्यामुळे सध्या लोकल रेल्वेत याची जोरदार चर्चा सुरू आहे.

याबाबत मिळेली माहिती अशी की, दिवा, कोपर, डोंबिवली स्थानकांच्या दरम्यान ट्रेनच्या फस्ट क्लास डब्यात चढून लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून टीसी असल्याचा धाक दाखवत काही दिवसापासून लूट सुरू होती. याचा प्रवासांना सशंय आल्याने त्यांनी स्थानक प्रबंधक कार्यालयात तक्रार दिली होती. त्याप्रमाणे दिवा स्थानकात पोलिसांनी कारवाई करत 21 वर्षीय विजय बहादूर सिंह नावाच्या वैक्तीला ताब्यात घेतले.

त्याच्याकडे चौकशी आणि अंगाची झडती घेतल्यानंतर ओळखपत्र सापडले. यानंतर मुख्य तिकीट निरीक्षक प्रमोद सरगईया यांच्याकडून अधिक माहिती घेतली असता तो तोतया असल्याचे उघड झाले. यानंतर त्याला बेड्या ठोकत ठाणे लोहमार्ग पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. तर त्याला लोहमार्ग न्यायालयात हजर केले असता, त्याची न्यायालयीन पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

Published on: Aug 26, 2023 12:43 PM