MNS Padwa Melawa : मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
Raj Thackeray News : गुढी पाडवानिमित्त आज मनसेचा पाडवा मेळावा शिवतीर्थावर पार पडणार आहे. या मेळाव्यासाठी मनसेकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे.
दादरच्या शिवतीर्थावर आज राज ठाकरेंची तोफ धडाडणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज पार्कच्या मैदानावर आज मनसेचा गुढी पाडवा मेळावा पार पडणार आहे. मनसेकडून राज ठाकरेंच्या सभेसाठी वातावरण निर्मिती सुद्धा करण्यात आली आहे. संपूर्ण मुंबई शहरात मनसेच्या गुढी पाडवा मेळाव्याचे बॅनर झळकत आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भाषणाकडे कायमच सगळ्यांच लक्ष असतं. त्यामुळे आज राज ठाकरे काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर मनसेच्या पक्ष संघटनेत राज ठाकरेंनी अनेक बदल केलेले आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगाने मनसे कार्यकर्ते आता कामाला लागले आहे. त्यातच आज मनसेचा गुढी पाडवा मेळावा होणार असल्याने या मेळाव्याच्या निमित्ताने मनसेकडून जोरदार बॅनरबाजी आणि शक्ती प्रदर्शन करण्यात येत आहे. मेळाव्यापूर्वी राज ठाकरे शिवाजी पार्क परिसरात रॅली देखील काढणार आहेत.

'पहलगाम'वरून मविआतील मतभेद उघड, पवार अन् राऊतांचं वेगळं मत

‘सिंधू’ करार स्थगितीचा प्लॅन ठरला... पाकिस्तानवर 'वॉटर स्ट्राईक'

'ही आमची चूक...', पाकच्या रक्षा मंत्री ख्वाजा आसिफ यांची मोठी कबुली

पहलगाम हल्ल्यानंतर काहीतरी मोठं घडणार? शाहांकडून बैठकांचा सपाटा अन्...
