Raj Thackeray : हिंदू आहोत, हिंदी नाही.. संघर्ष अटळ; राज ठाकरेंची आग पाखड
Raj Thackeray On Hindi In Schools : नव्या शैक्षणिक धोरणात शाळांना पहिली ते पाचवी पर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी देखील अनिवार्य करण्यात आलेली आहे. त्यावरून वाद निर्माण झाला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरकारला चांगलच धारेवर धरलं आहे.
शाळांना पहिलीपासून हिंदी भाषेच्या सक्तीवर राज ठाकरे चांगलेच संतापले आहेत. हिंदीची सक्ती खपवून घेणार नाही, असा इशाराच राज ठाकरे यांनी दिला आहे. नव्या शैक्षणिक धोरणात शाळांना पहिली ते पाचवी पर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी देखील अनिवार्य करण्यात आलेली आहे. त्यावरून आता हा वाद निर्माण झाला आहे.
यावर ठाकरेंनी म्हंटलं आहे की, मी स्वच्छ शब्दांत सांगतो की ही सक्ती महाराष्ट्र नव निर्माण सेना खपवून घेणार नाही. सध्या जे सगळीकडे ‘हिंदीकरण’ करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, ते महाराष्ट्रात आम्ही यशस्वी होऊ देणार नाही. हिंदी ही देशातील इतर भाषांसारखी राज्य भाषा आहे. ती महाराष्ट्रात का म्हणून पहिलीपासून शिकायची? आम्ही हिंदू आहोत, ऑन हिंदी नाही आहोत! महाराष्ट्रावर हिंदीकरणाचा मुलामा द्यायचा प्रयत्न कराल तर महाराष्ट्रात संघर्ष अटळ आहे. या सगळ्याकडे पहिलं तर लक्षात येतं की सरकार हा संघर्ष मुद्दाम घडवत आहे. आज भाषा सक्तीची करत आहेत, उदय इतर गोष्टी सक्तीच्या करतील. म्हातारी मेल्याचं दु:ख नाही. पण काळ सोकावतो! अशा सणसणीत शब्दात राज ठाकरे यांनी सरकारला खडेबोल सुनावले आहेत.
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम
वाल्मिक कराडचा काऊंटडाऊन सुरू? आरोप निश्चितीसाठी कोर्टाकडून डेडलाईन
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली

