Sandeep Deshpande : ‘…त्याची गरज काय? आता टोकाला जाईपर्यंत संघर्ष’, ‘हिंदी’विरोधात मनसेची रणनिती ठरली?
हिंदी भाषेला महाराष्ट्रातील शाळांमध्ये पहिलीपासून अनिवार्य करण्यासा मनसेकडून विरोध दर्शविला जातोय. अशातच मनसे नेते संदीप देशपांडे यांनी अजित पवारांवर यासंदर्भातील वक्तव्यावरून निशाणा साधला आहे. 'जर अजित पवारांना हिंदी राष्ट्रभाषा वाटत असेल, तर त्यांनी पहिलीपासून धडे घ्यावेत. त्यांना पुन्हा शाळेत पाठवा'
राज्य शालेय अभ्यासक्रम आराखडा २०२४ नुसार महाराष्ट्रात पहिलीपासूनच हिंदी ही भाषा अनिवार्य करण्यात आली आहे. यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह मनसे नेते देखील आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. यासंदर्भात आज राज ठाकरे यांनी मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक बोलवली होती. या बैठकीनंतर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी आपली प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी एकच म्हटलं, ‘संघर्ष होईल आणि तोही टोकाला जाईपर्यंत संघर्ष होईल’, असं म्हणत संदीप देशपांडेंनी पुन्हा टोकाचा इशारा दिली. पुढे ते म्हणाले, हिंदी ही भाषा सक्तीची केल्यानंतर मनसेकडून काल अल्टिमेटम देण्यात आलं आहे. आता शासन काय निर्णय करतंय त्यावर पुढचं पाऊल येणाऱ्या काही दिवसात कळेल, असा इशारा संदीप देशपांडेंनी दिला आहे. हिंदी ही राष्ट्रभाषा नाही. आज हिंदी भाषा सक्तीची करत आहात. उद्या बोलाल गुजराती भाषा शिका, परवा बोलाल तामिळ शिका, असं होत नाही, आम्ही आमच्या राज्याची भाषा शिकू. दुसऱ्या राज्याची भाषा आम्ही का शिकायची? हे बंधनकारक करण्याला आमचा विरोध असल्याचे संदीप देशपांडे म्हणाले.

पाकिस्तान बॅकफूटवर, 5 वाजेपासून युद्धविराम, दोन्ही देशांकडून सहमती अन

भारत-पाक तणावादरम्यान मुंबईकरांसाठी मोठी बातमी, आता 9 जूनपर्यंत....

मोदी सरकारचा दहशतवादाविरुद्ध मोठा निर्णय, यापुढे तसं कृत्य युद्ध ठरेल

भारतीय लष्कराकडून सैन्याच्या शौर्याचा व्हिडीओ शेअर, एकदा बघाच...
