‘लाडकी बहीण लाडका भाऊ एकत्र आले असते तर…,’ राज ठाकरे यांनी घेतली अशी फिरकी की…
राज ठाकरे हे अमेरिकेत दौऱ्यावर गेले होते. त्यानंतर भारतात आल्यानंतर प्रथमच त्यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेतला. राज्यातील अनेक प्रश्न आहेत. त्याकडे लक्ष दिलं पाहिजे हेच विधानसभेतील तुमचं कँपेन असलं पाहिजे. एकमेकांना शिव्या द्यायच्या आणि शिव्या देत लोकांचं लक्ष विचलीत करायचं आणि निवडणूका करायच्या.यातून हाताला काही लागणार नाही असेही राज ठाकरे यांनी सांगितले.
राज ठाकरे यांनी परदेशातून आल्यानंतर प्रथमच पक्षाचा मेळावा घेतला. यात त्यांनी परदेशातील लोक पर्यावरणाची किती काळजी घेतात ते सांगितले. ते पुढे म्हणाले आपल्यातील काही गोष्टी सुधारणं गरजेचं आहे. या देशात बेसूमार जंगलतोड होते ती कशासाठी होते. आपल्याकडे होळी आली की आपण सांगतो जंगलतोड करू नका.आपण आपल्या धर्माकडे पाहिलं पाहिजे. जेव्हा आपल्या धर्मातील हजारो लोकं मरतात तेव्हा त्यांचे अंतिमसंस्कार लाकडाने होतो. लाकडाचा सर्वाधिक वापर स्मशानभूमीत होतो. काही गोष्टी आपण बदलल्या पाहिजे. ज्यांच्याकडे जंगलं आहेत, तरी ते लोक जमिनीखाली माणसं पुरत आहेत. आणि आपण राजरोज जंगलतोड करत आहोत. सरकारने विद्यूत दाहिन्यांचं प्रमाण वाढवलं पाहिजे. त्याशिवाय ही गोष्ट थांबणार नाही. आपल्याकडे या मूळ गोष्टीकडे लक्ष द्यायला वेळ नाही. नोकरी, आरोग्य आणि पाण्याच्या प्रश्नावर लक्ष द्यायला आपल्याकडे ‘लाडकी बहीण आणि लाडका भाऊ’ सुरु आहे. परंतू 1500 रुपये द्यायला तिजोरीत पैसे आहेत का? येथे रस्त्यांवरील खड्डे बुजवायला पैसा नाही असा टोला राज ठाकरे यांनी लगावला. ते पुढे म्हणाले की अहो लाडकी बहीण आणि भाऊ एकत्र आले असते तर दोन्ही पक्ष टिकले असते. योजना कशाला पाहिजे त्यासाठी. ते पुढे म्हणाले की सर्वांना हातजोडून विनंती आहे, जिथे पूर आले, जिथे घरात पाणी आलंय, प्रत्येक घरात जा आणि मदत करा. आपण पक्ष म्हणून मदत करूत. पण तुम्हीही वैयक्तिक जाऊन लोकांना भेटा.त्यांना मदत करा असेही आवाहन राज ठाकरे यांनी यावेळी केले.