सभेला परवानगी मिळाली ना पण अटी आणि नियमांसह !
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची तोफ उद्या पुण्यातून धडाडणार आहे. पुण्यातल्या (Pune MNS) या सभेसाठी मनसे नेत्यांकडून जोरदार तयारी करण्यात आलीय. या सभेसाठी मनसेकडून टीझर पे टीझर येत आहेत. आताच या सभेचा दुसरा टीझर (Raj Thackeray Speech Teaser) बाहेर आला आहे.
पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची तोफ उद्या पुण्यातून धडाडणार आहे. पुण्यातल्या (Pune MNS) या सभेसाठी मनसे नेत्यांकडून जोरदार तयारी करण्यात आलीय. या सभेसाठी मनसेकडून टीझर पे टीझर येत आहेत. आताच या सभेचा दुसरा टीझर (Raj Thackeray Speech Teaser) बाहेर आला आहे. उद्या सकाळी 10 वाजता ही सभा पार पडणार आहे. राज ठाकरेंच्या सभेला पोलिसांची परवानगीही मिळाली आहे. या सभेसाठी पोलिसांकडून मात्र तब्बल 13 अटी घालण्यात आल्या आहेत. राज ठाकरेंच्या औरंगाबादेतल्या सभेलाही अशाच 16 अटी घातल्या होत्या. त्यामुळे आता पुण्यात तरी अटींचं पालन होणार? याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे.
Published on: May 21, 2022 06:44 PM
Latest Videos