अग्रवाल कुटुंबाचा अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनशी संबंध, शिवसेना नेत्याचा गंभीर आरोप
भावासोबतच्या मालमत्ता वादात अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनशी हातमिळवणी केल्याचा गंभीर आरोप शिवसेनेचे नेते अजय भोसले यांनी केला आहे. यासह अजय भोसले यांच्या हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी विशाल अग्रवाल आणि अग्रवाल कुटुंबावर गुन्हा दाखल असल्याची माहिती मिळत आहे.
पुणे अपघाताला जबाबदार अग्रवाल कुटुंबाची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. विशाल अग्रवाल याच्या वडिलांविरोधात न्यायालयात खटला सुरू आहे. भावासोबतच्या मालमत्ता वादात अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनशी हातमिळवणी केल्याचा गंभीर आरोप शिवसेनेचे नेते अजय भोसले यांनी केला आहे. यासह अजय भोसले यांच्या हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी विशाल अग्रवाल आणि अग्रवाल कुटुंबावर गुन्हा दाखल असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, ज्यांच्यावर गोळीबार करण्यात आला ते अजय भोसले थोडक्यात बचावले. मात्र आता अग्रवाल कुटुंब पुन्हा एकदा चर्चेत आल्यावर अजय भोसले यांची केसही पुन्हा उजेडात आली. अशातच टीव्ही 9 ने खास त्यांच्याशी बातचीत केली. ते म्हणाले, माझी आणि राम अग्रवाल यांची मैत्री होती. मात्र सुरेंद्र अग्रवाल आणि राम यांच्यात पैशांवरून वाद सुरू होते. त्या दरम्यान सुरेंद्रकुमार अग्रवाल हे बँकॉकला जाऊन छोटा राजनला भेटून आले. त्यांनी तिकडे जाऊन सुपारी दिली. माझा भाऊ काही मला पैसे देत नाही आणि अजय भोसले हा माझ्या भावाला मदत करत आहे. तेव्हा मला अनेक वेळा छोटा राजनचे धमकीचे फोन यायचे, असा खुलासा अजय भोसले यांनी केला.