राहुल गांधी यांच्यावरील कारवाईचा खासदारांकडून निषेध; ‘ही’ कृती करत निषेध नोंदवणार
Rahul Gandhi : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना सूरत सत्र न्यायालयाने सुनावलेली 2 वर्षांची शिक्षा त्यानंतर रद्द झालेली खासदारकी याचा विरोधी पक्षाकडून निषेध करण्यात येत आहे.
नवी दिल्ली : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना सूरत सत्र न्यायालयाने 2 वर्षांची शिक्षा सुनावली. त्यानंतर राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाली. या सगळ्या घटनाक्रमाचा विरोधी पक्षाकडून निषेध करण्यात येत आहे. काळ्या रंगाचा पोषाख परिधान करत निषेध करण्यात येत आहे. याबाबत काँग्रस खासदार रजनी पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “आज आम्ही काळा पोशाख परिधान करून भाजपचा निषेध करतोय. संविधान वाचवण्यासाठी तृणमूल काँग्रेस आमच्यासोबत आहे. आमची दोन प्रकारची लढाई आहे, पहिली कायदेशीर आणि दुसरी राजकीय. हा लढा आम्ही देत राहणार आणि जिंकणार सुद्धा, असा विश्वास रजनी पाटील यांनी व्यक्त केलाय.सावरकरांबद्दल जे सत्य आहे तेच राहुल गांधी यांनी सांगितलं. उद्धव ठाकरे यांची भूमिका ही त्यांची भूमिका आहे. मात्र याबाबत गांधी आणि ठाकरे दोन्ही बाजूने चर्चा होऊ शकते, असंही रजनी पाटील म्हणाल्या आहेत.