“आता तुमच्यावर वेळ आली म्हणून…”, मनसे-ठाकरे गटाच्या युतीवर राजू पाटील यांचा उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा
मनसेचे नेते आणि राज ठाकरेंचे विश्वासू अभिजीत पानसे यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची भेट घेतली आहे. त्यामुळे मनसे आणि ठाकरे गटाच्या युतीबद्दल चर्चा रंगू लागली. यावर आता मनसे आमदार राजू पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
ठाणे : मनसेचे नेते आणि राज ठाकरेंचे विश्वासू अभिजीत पानसे यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची भेट घेतली आहे. त्यामुळे मनसे आणि ठाकरे गटाच्या युतीबद्दल चर्चा रंगू लागली. यावर आता मनसे आमदार राजू पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “मनसे नेते अभिजीत पानसे आणि संजय राऊत यांचे पहिल्यापासून चांगले संबंध आहेत. पानसे यांनी अलीकडेच ‘ठाकरे’ चित्रपट काढला होता. मला वाटतंय, आता नवीन एखादी स्क्रीप्ट आली असेल त्यामुळे ते संजय राऊतांशी चर्चा करण्यासाठी गेले असावेत. मला नाही वाटतं की युती होईल. कारण ही युती व्हावी, अशी मराठी माणसाची इच्छा असली तरी समोरच्याची पण इच्छा असली पाहिजे. समोरच्याला युती व्हावी यापेक्षा भीती जास्त वाटत आहे. त्यांच्याशी युती करायची माझी अजिबात इच्छा नाही. फक्त ते अडचणीत आहेत म्हणून आम्ही युती का करावी? राजसाहेब अडचणीत असताना आणि त्यांच्या घरी कौटुंबीक प्रसंग घडला असताना तुम्ही आमचे नरसेवक फोडले. आता तुमच्यावर वेळ आली म्हणून आम्ही युती करायची का? आम्ही आतापर्यंत कुणाशीही युती केली नाही. यापुढेही करू नये, असं माझं वैयक्तिक मत आहे. माझं हे मत मनसैनिक म्हणून आहे,” मनसेचा नेता म्हणून नाही.