कृषी कायदे संसदेत रद्द व्हावेत, राकेश टिकैत यांची प्रतिक्रिया

| Updated on: Nov 19, 2021 | 11:50 AM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृषी कायदे मागे घेतले आहेत. हे कायदे संसदेत केले आहेत तिथं रद्द व्हावेत, असं राकेश टिकैत म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृषी कायदे मागे घेतले आहेत. हे कायदे संसदेत केले आहेत तिथं रद्द व्हावेत. एमएसपीवर चर्चा झाली पाहिजे. प्रदूषण बील आहे यासंदर्भात चर्चा झाली पाहिजे. देशातील शेतकऱ्यांना समजून घेण्यास पंतप्रधानांना एक वर्ष लागत असेल तर ही खेदाची बाब आहे. हा देश लोकशाहीनं चालणारा आहे. आज आमच्या समितीची बैठक आहे. किसान संयुक्त मोर्चाची बैठक आहे. संसदेत कायदे बनवले गेले आहेत. संसदेत कायदे रद्द केल्यानंतर आम्ही परत जाऊ, असं राकेश टिकैत म्हणाले. एमएसपीचा मुद्दा गंभीर प्रश्न असल्याचं राकेश टिकैत म्हणाले.

Bacchu Kadu on PM | फक्त कायदे मागे घेऊन चालणार नाही, धोरणं बदलावी लागतील, बच्चू कडूंचं आवाहन
Sadabhau Khot | शेतकऱ्यांच्या दृष्टीने आजचा हा काळा दिवस, सदाभाऊ खोत यांची कृषी कायदे रद्दवर प्रतिक्रिया