Special Report | आरोपांचा धुरळा…तरी Ramdas Athawale यांना युतीची आशा – tv9
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले हे दोन दिवसांपासून मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. शिवसेना आणि भाजपच्या युतीसाठी आपण पुढाकार घेणार असून लवकरच या संदर्भाने शिवसेना खासदार संजय राऊत यांची भेट घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
औरंगाबादः केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले हे दोन दिवसांपासून मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. औरंगाबाद तसेच मराठवाड्यातील आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आरपीआय कार्यकर्त्यांची बैठक त्यांनी आयोजित केली आहे. आगामी निवडणुकीतील पक्षाची रणनिती ठरवण्यासाठी ते कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहेत. यावेळी टीव्ही 9 प्रतिनिधींशी त्यांनी संवाद साधला. शिवसेना आणि भाजपच्या युतीसाठी आपण पुढाकार घेणार असून लवकरच या संदर्भाने शिवसेना खासदार संजय राऊत यांची भेट घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच महापालिका निवडणुकांमध्ये आरपीआय भाजपसोबत निवडणुक लढवणार असल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

गुजरातमधल्या 50 पाकिस्तानी हिंदू कुटुंबांचा परत जाण्यास नकार

पाकिस्तान सरकारला पाकिस्तानी नागरिकही वैतागले; गिलगीटमध्ये निदर्शने

शेतकऱ्यांचा माल संपला अन् बाजारात दरवाढीला सुरुवात

संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय देशमुखांची गृहमंत्रालयाला मोठी मागणी
