उद्धव ठाकरेंनी धोका दिला, म्हणून फडणवीस मुख्यमंत्री बनले नाहीत, रामदास आठवलेंची टीका

“उद्धव ठाकरेंनी धोका दिला, म्हणून फडणवीस मुख्यमंत्री बनले नाहीत”, रामदास आठवलेंची टीका

| Updated on: Jun 14, 2023 | 12:36 PM

'राष्ट्रात मोदी, राज्यात शिंदे' या जाहिरातीवरून शिवसेना आणि भाजपाच बिनसल्याच्या चर्चा सुरु आहेत. दरम्यान केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचं एक वक्तव्य चर्चेत आलं आहे.

मुंबई : ‘राष्ट्रात मोदी, राज्यात शिंदे’ या जाहिरातीवरून शिवसेना आणि भाजपाच बिनसल्याच्या चर्चा सुरु आहेत. दरम्यान केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचं एक वक्तव्य चर्चेत आलं आहे. “भाजप-शिवसेना युतीच्या सरकारचं काम अत्यंत योग्यरितीने सुरु आहे. अनेक निर्णय शिंदे-फडणवीस दोघं मिळून घेत आहेत. जशी लोकप्रियता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आहे, तशीच देवेंद्र फडणवीस यांची आहे. 50 आमदारांमुळे हे सरकार बनले आहे, त्यामुळे शिंदे यांना मुख्यमंत्री केले. पण उद्धव ठाकरे यांनी धोका दिला, त्यामुळे फडणवीस मुख्यमंत्री बनले नाही. उद्धव ठाकरे यांनी धोका दिला नसता तर मविआचं सरकार आलं नसतं”, असं रामदास आठवले म्हणाले.

Published on: Jun 14, 2023 12:36 PM