शिर्डीतून लोकसभा निवडणूक लढवणार का? रामदास आठवले स्पष्टचं बोलले, मी पुन्हा...

शिर्डीतून लोकसभा निवडणूक लढवणार का? रामदास आठवले स्पष्टचं बोलले, “मी पुन्हा…”

| Updated on: May 28, 2023 | 1:13 PM

आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी पुन्हा एकदा शिर्डी लोकसभा मतदारसंघातून लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे. "मी पुन्हा शिर्डीत येणार आहे...

अहमदनगर : आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी पुन्हा एकदा शिर्डी लोकसभा मतदारसंघातून लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे. “मी पुन्हा शिर्डीत येणार आहे. 2009 मध्ये मी शिर्डीतून निवडणूक लढवली होती. संधी मिळाली तर मी पुन्हा शिर्डीतून लोकसभा निवडणूक लढवेल.कारण माझा शिर्डीच्या जनतेवर विश्वास आहे. इथली जनता मला स्वीकारेल”, असं रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. तसेच “पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली शिर्डीचा मी सर्वांगीण विकास करणार”, असंही रामदास आठवले यांनी म्हटले आहे. रामदास आठवले यांच्या या इच्छेमुळे शिवसेनेची धाकधूक वाढली आहे. रामदास आठवले यांनी यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाजपसोबत पुन्हा येण्याची ऑफर दिली आहे. “उद्धव ठाकरे चांगला माणूस आहे, मात्र त्यांनी घेतलेला निर्णय चुकीचा आहे. अजूनही वेळ गेलेली नाही. त्यांनी भाजपसोबत येण्याचा विचार करावा. भाजपसोबत आले तर तुमचं स्वागत करू”, असं आठवले यांनी म्हटलं आहे.

 

Published on: May 28, 2023 01:12 PM