“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी केली”, शिवसेनेच्या बड्या नेत्याचा हल्लाबोल
आज शिवसेनेचे दोन वर्धापनदिन साजरा केले जात आहे. यानिमित्ताने शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
मुंबई : आज शिवसेनेचे दोन वर्धापनदिन साजरा केले जात आहे. यानिमित्ताने शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. “आज शिवसेनेचे दोन वर्धापनदिन साजरे केले जातायत, याचं मनात दु:ख आहे.जर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना धरून उद्धव ठाकरे असते तर ही मराठी माणसांमध्ये फूट पडली नसती. शिवप्रमुखांच्या विचाराशी गद्दारी उद्धवजीनी केली.माझ्या पोटी असा नालायक मुलगा निघाला याचं दु:ख बाळासाहेब ठाकरेंना असणार.वैयक्तिक स्वार्थासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत उद्धवजी गेले, असं रामदास कदम म्हणाले. तसेच खोके घेतले म्हणून सिध्द केले तर तुमच्या घरी मी भांडी घासेन. तुम्ही सिध्द करू शकला नाही तर माझ्या घरी तुम्ही भांडी घासा”, असं रामदास कदम म्हणाले.
Published on: Jun 19, 2023 02:39 PM
Latest Videos