AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शेततळ्यात गव्यानं घेतला मनसोक्त स्विमींगचा आनंद, बघा रानगव्याची मौज

शेततळ्यात गव्यानं घेतला मनसोक्त स्विमींगचा आनंद, बघा रानगव्याची मौज

| Updated on: Mar 13, 2023 | 10:49 PM

VIDEO | शेततळ्यात गव्याने घेतला वॉटरपार्कचा आनंद, कुठली आहे घटना... गव्याला बघण्यासाठी गावकऱ्यांची मोठी गर्दी

सांगली : रणरणत्या उन्हात तो आला, त्यानं शेततळं पाहिलं आणि थेट पाण्यात उडी घेतली. मनसोक्त स्विमींग केलं, आणि आल्यापावली परतला. गेल्या तीन दिवसांत सांगली जिल्ह्यातील तासगाव, कवठेमहांकाळ व जतच्या दुष्काळी पट्ट्यात शेतकऱ्यांना दर्शन दिलेल्या गव्याने तासगाव तालुक्यातील डोंगरसोनी येथे शेततळ्यात यथेच्छ डुंबण्याचा मुक्त आनंद लुटला. मंगळवेढ्याकडून जत तालुक्यात शिरलेल्या गव्याने कुंभारीतून कवठेमहांकाळकडे कूच केले. यादरम्यान अनेकांना तो दिसला. कोणालाही उपद्रव मात्र केला नाही. लोकांनी कळवल्यानंतर वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी ठिकठिकाणी त्याच्या मागावर राहिले. रणरणत्या उन्हात त्याने डोंगरसोनीमध्ये प्रवेश केला. तेथे विजय झांबरे या शेतकऱ्याच्या शेततळ्याने त्याला मोहवले. डोक्यावर कडक उन्हे आणि समोर थंडगार पाणी पाहून राहवले नाही. तळ्यातील थंडगार पाणी प्यायले. लोकांना न जुमानता थेट तळ्यात उडी घेतली. मनसोक्त स्नान केले. त्यानंतर आपल्याच मस्तीत थंडावलेल्या अंगाने तळ्यातून बाहेर पडला. यावेळी गावकऱ्यांनी त्याला बघण्यासाठी मोठी गर्दी केली होती.

Published on: Mar 13, 2023 10:49 PM