रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं देखणं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची लागली रिघ

रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं देखणं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची लागली रिघ

| Updated on: Sep 07, 2024 | 4:25 PM

रंगारी बदक चाळीच्या गणपतीचा मोठा वारसा आहे. या मंडळाने प्रतिष्ठापना केलेली यंदाची 22 फूटी गणेश मूर्ती डोळ्यांचे प्रारणे फेडत आहे. मंडळाने यंदा अक्कल कोटचे स्वामी समर्थ यांचा देखावा सादर केला आहे.

मुंबईतील सर्वात जुन्या गणेश मंडळापैकी एक असलेल्या रंगारी बदक चाळीतील गणेश उत्सवाचं यंदाचं 85 वर्षे आहे. या मंडळाची बाप्पाची 22 फूटांची आकर्षक मूर्ती सर्वांचं लक्ष वेधत आहे. यंदा मंडळाने गणेशाचे लंबोदर हे रुप साकारले आहे. अनेक जुन्या मंडळापैकी गणपती बाप्पाचे सर्वात जुने मंडळ असलेल्या रंगारी बदक चाळीतील मंडळाने यंदा अक्कलकोटच्या स्वामी समर्थांचा देखावा साकारला आहे. या मंडळाने स्वातंत्र्य चळवळी पासून संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील राजकीय भाष्य करणारे देखावे साकारले होते. त्यामुळे रंगारी बदक चाळीने आपला 85 वर्षांचा परंपरेचा समर्थ वारसा पेलला आहे असे म्हटले जात आहे.

Published on: Sep 07, 2024 04:24 PM