हेलिकॉप्टर, धुरळा अन् पोलीस! रावसाहेब दानवेंनी सांगितला जिगरी दोस्तासोबतचा किस्सा!

हेलिकॉप्टर, धुरळा अन् पोलीस! रावसाहेब दानवेंनी सांगितला जिगरी दोस्तासोबतचा किस्सा!

| Updated on: Oct 26, 2022 | 1:25 PM

रावसाहेब दानवे यांनी आपल्या मित्रासोबतचा एक किस्सा सांगितला...

औरंगाबाद : केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांचा दिवाळी स्नेहसंमेलन कार्यक्रम पार पडला. यावेळी त्यांनी आपल्या मित्रासोबतचा एक किस्सा सांगितला. दानवे यांचा मित्र हेलिकॉप्टरमध्ये (helicopter) बसला तेव्हाचा किस्सा त्यांनी सांगितला. दानवेंनी हा किस्सा सांगितल्यानंतर चांगलाच हश्या पिकला. माझा मित्र हेलिकॉप्टरमध्ये बसला. मात्र हेलिकॉप्टर उतरल्यानंतर उडालेल्या धुरळ्यात तो हरवला. धुरळा खाली बसल्यानंतर तो समोर आला. तेव्हा पोलिसांना प्रश्न पडला तो नक्की कुठून आला… असा गमतीदार किस्सा दानवेंनी सांगितला. त्यानंतर एकच हश्या पिकला.

Published on: Oct 26, 2022 01:25 PM