NDAचा रासपला दे धक्का! बैठकीला बोलावलच नाही; जानकर म्हणतात, ‘आम्ही आमची औकात चौकात दाखवू…’
दुसरी बैठक दिल्लीत होत असून ती पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली NDA तील घटक पक्षांची आहे. यावेळी महाराष्ट्रातून प्रहार संघटना, जनसुराज्य पक्ष, शिंदे गट, अजित पवार गट बैठकीला गेला आहे.
मुंबई, 18 जुलै 2023 | देशातील दोन ठिकाणी आज महत्वाच्या दोन बैठका पार पडत आहेत. त्यातील एक भाजपला रोखण्यासाठी देशातील प्रमुख विरोध पक्ष एकत्र आले आहेत. त्यांची बैठक बंगळुरुमध्ये काँग्रेसच्या नेतृत्वाखाली होत आहे. ज्यात 26 विरोधी पक्ष एकत्र पुन्हा एकत्र येत आहेत. तर दुसरी बैठक दिल्लीत होत असून ती पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली NDA तील घटक पक्षांची आहे. यावेळी महाराष्ट्रातून प्रहार संघटना, जनसुराज्य पक्ष, शिंदे गट, अजित पवार गट बैठकीला गेला आहे. मात्र यावेळी भाजपकडून एनडीएच्या बैठकीचे निमंत्रण राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष आणि माजी मंत्री महादेव जानकर यांना देण्यात आलेले नाही. यावरू त्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी, आम्हाला एनडीएच्या बैठकीचे निमंत्रण मिळालेले नाही. आम्ही कोणाकडेही भीक मागायला जाणार नाही. माझा स्वतःचा पक्ष आहे आणि मी माझा पक्ष वाढवणार असे म्हटलं आहे. तर आता रासपची गरज भाजपला नाही म्हणूनच त्यांनी बोलावलं नाही अशी टीका त्यांनी केली आहे. याचबरोबर आम्ही आम्ही बहुसंख्य आमदार निवडून आणू तेव्हा आम्ही आमची औकात चौकात दाखवून देऊ असा इशारा दिला आहे.