RSS प्रमुख मोहन भागवत यांचं मोठं वक्तव्य, रहायचं असेल तर रहा; इस्लामला धोका…
भागवत यांनी हिंदू, मुस्लिम, इस्लामवर बोलत आज आपले मत मांडले. यावेळी त्यांनी एलजीबीटी समुदायावर ही भाष्य केलं. त्याच्यावर सध्या मोठी चर्चा सुरु आहे.
वाशिम : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी हिंदू, मुस्लिम, इस्लामवर मोठं भाष्य केलं. त्यांच्या या वक्तव्याची सगळीकडे च जोरदार चर्चा होताना दिसत आहे. भागवत यांनी आपली ओळख, राष्ट्रीयत्व आणि सर्वांना आपलं मानणं तसेच सर्वांना सोबत घेऊन चालण्याची वृत्ती ही हिंदू धर्माची आहे. या देशात इस्लामला कोणताही धोका नाही. ते वाशिम जिल्ह्यातील कारंजा येथील श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज संस्थान येथे एका कार्यक्रमासाठी आले होते.
भागवत यांनी हिंदू, मुस्लिम, इस्लामवर बोलत आज आपले मत मांडले. यावेळी त्यांनी एलजीबीटी समुदायावर ही भाष्य केलं. त्याच्यावर सध्या मोठी चर्चा सुरु आहे.
हिंदू आणि मुस्लिम हे धर्म नसून हे चुकीचं नाव आहे. धर्म एकच आहे तो सनातन आहे. तो सृष्टीची धारणा करणारा शाश्वत नियम आहे. तो कधीही बदलत नाही, असे भागवत यांनी म्हटलं आहे. तसेच ज्या मुस्लिमांना येथे राहायचं आहे त्यांनी राहावं. येथे इस्लामला काही धोका नाही. पण आम्हीच मोठे आहोत, हा हट्ट सोडावा, आता पुन्हा राजाच बनायचंय, ही भावना सोडली पाहिजे. एखादी हिंदु व्यक्तीही अशा विचारांची असेल तर त्यालाही अशा भावनेचा त्याग करावा लागेल.